भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना

nama ani dama bap lek donhi | rajai gonai | sasu suna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना ॥१॥ नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र । जन्मले पवित्र हरिभक्त ॥२॥ आउबाई लेकी नाउबाई बहिणी । तिहीं चक्रपाणी वेधियेला ॥३॥ लाडी आणि येसी बहिना साकराई । एका जनार्दनीं पाही वंशावळी ॥४॥