भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी

namachen mahiman sadar aika | tariyele dekha mahapapi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥ पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामें जाहला ॥२॥ गणिका पांखिरूं नाम जपे सदा । नोहे तिसी बाधा गर्भवासा ॥३॥ एका जनार्दनीं कलीमाजीं नाम । उत्तम उत्तम जपा आधीं ॥४॥