भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें ॥१॥ प्रपंचाचें उगवोनि जाळें । केलें षडवैरीयांचें तोंड काळें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥ नवल कृपेंचें विंदान कैसें । जनार्दनें सरसें केलें मज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभेद भक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर ॥१॥ निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिशे वावो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥ येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभ्यासीं द्रष्ट आटला । अहं सोहंचा घोट भरला । साक्षित्व देखोनि विराला । वास्तुमाजीं ॥१॥ जो जो वस्तु झाला केवळ । तेंचि अंतःकरण निश्चळ । त्रिगुणाची तळमळ । हारपोनि गेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥ धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पैं जन्माचें सार्थक तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥ नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे ॥१॥ नारदातें प्रश्न करी अमरनाथ । शुध्द हें अमृत कोठें होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अरे अरे मना । सत्य सत्य धरी ध्याना । पंढरीचा राणा । वेध ठेवीं तयाचा ॥१॥ तुज नाहें रे बंधन । सहज आकळे ब्रह्माज्ञान । वाउगें शोधन । नको करूं ग्रंथाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हां उघड समाधी नाममात्रें ॥१॥ हेंचि निरुपण उद्धवा श्रीकृष्ण । सांगतसे खुन जीवींची ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ