भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें

arjunache rathin shramala jagajethi | mhanoni kar theuni kantin ubha yethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥ कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणरविंद उभे विटे ॥३॥ धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करें । म्हणोनि श्रमें निर्धारें ठेविले कटीं कर ॥४॥ पुंडलीक भक्त देखोअनि तल्लीन जाला । एका जनार्दनीं ठेविला कटाई कर ॥५॥