असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला
asatan bandishalen | devaki dohale | garbha ghananile | athiyala
असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
asatan bandishalen | devaki dohale | garbha ghananile | athiyala
असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥
asatya janmalen asatyachen potin | arthabalen chavatin shikaviti
असत्य जन्मलें असत्याचें पोटीं । अर्थबळें चावटीं शिकविती ॥१॥ अर्थीं धरूनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणें मंत्रयंत्र ॥२॥
asatyacha shabda nako vache majhen | anik ho ka vojhen bhalataisen
असत्याचा शब्द नको वाचे माझें । आणिक हो का वोझें भलतैसें ॥१॥ परि संतरज वंदीन मी माथां । असत्य सर्वथा नोहे वाणी ॥२॥
asatyachen mul naradeh sachen | vayan kay yache kavatuk
असत्याचें मूळ नरदेह साचें । वायां काय याचे कवतूक ॥१॥ हरिनाम सार सेवीं तूं निर्धारें । आणीक पसार शीण वायां ॥२॥
asoni uttam kulin | nam nahin jyache kulin
असोनि उत्तम कुळीं । नाम नाहीं ज्याचे कुळीं ॥१॥ जन्मोनी अधम कुळीं । सदा जपे नामावळी ॥२॥
asoni kulincha hin | pari jyasi brahmadnyani | tyasi tinhin devadi suragan | vanditati
असोनि कुळींचा हीन । परी ज्यासी ब्रह्माज्ञानी । त्यासी तिन्हीं देवादि सुरगण । वंदिताती ॥१॥ त्याची मृत्युलोकीं सेवा । जयासी घडे सदैवा । मा ब्राह्मण भूदेवा । असंख्य पुण्य जोडे ॥२॥
asoni durachari | mukha gay nitya hari
असोनि दुराचारी । मुखा गाय नित्य हरी ॥१॥ तयाचें नमस्कारावे चरण । धन्य जगीं तो पावन ॥२॥
asoni na dise vegalachi ase | to pandharisi vase vitevari
असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥ कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥
asoni brahman | na kari jo sandhya snan
असोनि ब्राह्मण । न करी जो संध्या स्नान ॥१॥ तो पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
asoni sansarin apada | vache vade viththal sada
असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥ नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥
asoni uttam na kari bhajan | santaseva dan dharma nenen
असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें ॥१॥ काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥
asoni dehin amhin videhi bhai | natalon karma akarmachen thayin
असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं ॥१॥ माझें नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥
asoni sabarabhari bahma ani antarin | sampushtamajharin mhanati dev
असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥ कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥
astaman jaliya gramant paratale | gopal te gele gharogharin
अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥ आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥
asthimansacha ha kothala | aisa deh amangala
अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा ॥१॥ प्राणी म्हणती माझें माझें । खर जैसे वाहे वोझें ॥२॥
ahan trunavarta bali | praveshala gokulin | mohamamatechi rahatoli | bhavanditasu
अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥ रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥
ahan sohan kohan sarva atalen | drushya drashtratva sarva phitalen
अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें ॥१॥ ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥
ahan sohan kohan sandoniyan dei | nivruttiche payin budi dekha
अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा ॥१॥ अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥
ahan sohan vruksha to nighala vohan | yacha shenda nahin ma kothen kohan
अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं ॥१॥ कान्होबा उघद माझें कोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे कां रे निवाडे ॥२॥
ahammamata gharipuri | samul sadhali duri
अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी ॥१॥ चतुर्विध केलीं ताटें । मानी शरण गोमटें ॥२॥