भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हां उघड समाधी नाममात्रें

artha to vivad dnyan te upadhi | amhan ughad samadhi namamatren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हां उघड समाधी नाममात्रें ॥१॥ हेंचि निरुपण उद्धवा श्रीकृष्ण । सांगतसे खुन जीवींची ते ॥२॥ स्तुति अथवा निंदा परस्त्री परधन । तेथें कदा मन घालुं नये ॥३॥ एका जनार्दनीं हेचि ब्रह्मज्ञान । यापरतें साधन आन नाहीं ॥४॥