भजनी मालिका

भजने

जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सज्ज्न वर्तताती ॥१॥ येऊनियां पूजा प्राणि जे करिती । त्याचें सुख चित्तीं तया नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जैसी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे । त्याचें कर्तृत्व वाडें । फांशाधीन ॥१॥ झाला देखणा परी । उगला वर्तूं लागे शरीरीं । तैसी शक्ति ईश्वरीं । भूतें चळती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥ न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥ आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जो जया चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथें संदेही धरणें न लगे ॥१॥ द्रौपदी स्मरतां माधव । धांव घेतली लवलाहे । जया जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो जो काळ वेंचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनेकें होतसे ॥१॥ साधन जागा साधन जागा । पुढें दगा चुकवी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥ आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढेंचि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ॥ पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ