भजनी मालिका

भजने

जेथूनियां येणेंचि नाहीं । फिरोनियां कांही संसारा ॥१॥ तया नांव परमपद । लाभती मृग्ध हरिनामें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेथें कष्टें न लभे ज्ञान । आधीं पाहिजे समाधान । योगयाग तपाचें नाहीं कारण । शांति क्षमा दया जाण मुख्य धरी ॥१॥ आणिक नको रे साधन । वायां शीण ब्रह्माज्ञान । आम्हीं मुखीं गाऊं रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥ चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥ कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेथें जेणें केला वास । तोचि वाटे त्यास निजग्राम ॥१॥ एरवीं सर्वहि भूमंडळ । आहें हें स्थळ याचेंचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेथें जेथें मन जाईल गा माझें । तेथें तेथें तुझें रूप असो ॥१॥ ऐसी मज संवई लावीं निरंतर । जन्मजन्मांतरीं केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥ वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥१॥ अवघा आम्हां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं५७१

रचनाकार: संत तुकाराम