भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथे जें पाहे तेथें तें आहे

jethe jen pahe tethen ten ahe

जेथे जें पाहे तेथें तें आहे । उभारोनि बाहे वेद सांगे ॥१॥ सोमकांतीं झरा कोठील दुसरा । तत्त्वीं तत्त्वें धरा निजदृष्टीं ॥२॥ हेतु मातु आम्हा अवघाचि परमात्मा । सोहंभावें सोहं आत्मा सर्वी असे ॥३॥ मुक्तलग खुण मुक्ताई प्रमाण । देहीं देहो सौजन्य निजतेजें ॥४॥