भजनी मालिका

भजने

अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरीचें नाम ॥१॥ धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांठविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघाचि संसार करीन सुखाचा । जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ॥१॥ विठोबाचें नाम गाईन मनोभावें । चित्त तेणें नांवें सुख पावे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं ।

रचनाकार: संत तुकाराम