भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघां डोळां तुज म्यां पाहावें

avaghan dolan tuj myan pahaven

अवघां डोळां तुज म्यां पाहावें । अवघां श्रवणीं तुजचि ऐकावें ॥१॥ अवघी मूर्ति तुजपें ध्यावें । अवघां चरणीं तुझ्या पंथी चालावें ॥२॥ रखुमादेविवरु अदट दाविला । माझ्या देहीं वाढला ब्रह्माकारें ॥३॥