भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघिया आचार निष्ठा । चित्त जरी जाय वैकुंठा

avaghiya achar nishtha | chitta jari jay vaikuntha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघिया आचार निष्ठा । चित्त जरी जाय वैकुंठा । तरीच निस्तरिलें कष्टां । भवपाशापासोनी ॥१॥ धन्य धन्य चित्तवृत्ति । विठठल भक्तीची पुढत पुढती । त्याचे पूर्वज उद्धरती । गीत गाती रामकृष्ण ॥२॥ हेंचि जप तप ध्यान । हरी चरणीं ठेवूनि मन । साधले कार्यांचें कारण । रामकृष्ण उच्चारिणीं ॥३॥ नामा जपे ठेऊनि चित्त । अखंड चरणीं जाला रत । पुरले आमचे मनोरथ । सर्व कृतार्थ पैं जालों ॥४॥