भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरीचें नाम

avagha chi akar grasiyela kalen | ek chi niralen harichen nam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरीचें नाम ॥१॥ धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांठविलें ॥ध्रु.॥ शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥२॥ तुका म्हणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥३॥