भजनी मालिका

भजने

हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळा ॥१॥ देखणेंचि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती ॥१॥ देखणें तें नव्हे देखतील कैसें । देखण्याची असे सर्व डोळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥ परळ भोपळा गृहामाजी संपत्ति । भूषण कां श्रीपती सांगतसां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥ नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥ भक्तस्तवनीं ठेविेले कान । भक्तांपाशीं जीवप्राण । भक्तांकडे लाविलें मन । कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥ नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

हारस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम