भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे

hatant naroti jirna vastra bhar | mhanasi savadagar sant majhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥ परळ भोपळा गृहामाजी संपत्ति । भूषण कां श्रीपती सांगतसां ॥२॥ भणंगाचे घरां नित्यची राजपट । सांगसी अचाट ब्रीद त्यांचें ॥३॥ कैकाडयाचे वानी करिती गुडगुड । मजाला हें गूढ उमजेना ॥४॥ नामा म्हणे गाती प्रकाशाचें गाणें । आम्हां अघोरवाणें दिसतसे ॥५॥