भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा

hatin chakra sudarshan | vagavitan na manin tyacha shin | apulya bhaktanche rakshan | ani nirdalan arivarga

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥ भक्तस्तवनीं ठेविेले कान । भक्तांपाशीं जीवप्राण । भक्तांकडे लाविलें मन । कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥ नेणे भक्तांविण आणिक । करी दास्य होउनी सेवक । त्यांचे वचनाचें कौतुक । श्रवणीं मिरची भूषणें ॥३॥ भक्त पाहनि वाडेंकोडे । होऊनि ठाके तेचि पुढें । भक्त वनिती जे पवाडे । ऐके निवाडे बैसोनी ॥४॥ त्यांचि वचनें स्तवनमाळा । आवडी मिरवी आपुल्या गळां । त्यासि अवलोकितां डोळां । झाला देखण सर्वांगे ॥५॥ भक्तांच्या नामें नामांकित । त्यांचिया क्रिया कर्मे करित । त्यांचिया रुपें रुपमंडित । झाला भगवंत भक्तसुखें ॥६॥ निळा म्हणे भक्तांचिसाठीं । नाना स्वरुपें नटला नटीं । नाना अवतार त्यांचिये संकटी । नाना नामें धरियेलीं ॥७॥