भजनी मालिका
← भजनांकडे परत

हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च

harapalyachi naka chittin | dharun khanti vanyan cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥१॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥ होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥ तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥