भजनी मालिका

भजने

सेज सिद्ध झाली निजा धीधरा । आज्ञा द्यावी लोकां जाती आपुल्या घरा ॥१॥ रात्र बहुत जाहाली देवा चला मंदिरा । राईरखुमाबाई वाट पाहाती सुंदर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं सोहंकरी विसावा तों वरी । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकाचि परि स्थापिला पदीं । मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥ तैसेंचि केलें मजही देवा । निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥ घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम