भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये

sevaken karaven svamichen vachan | tyasi huntumpan kama naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥ घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां ॥ध्रु.॥ खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥ तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥