भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त

sevitan kathasar amrut | tenen god jale bhakta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥ मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥ प्रेमें नाचे कथामेळीं । सुखकल्लोळीं हरिनाम ॥३॥ गर्जती नाम सदा वाचे । एका जनार्दनी तेथें नाचे ॥४॥