भजनी मालिका

भजने

म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥ गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥ खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती । या हो या हो म्हणती पांडुरंगा ॥१॥ तुम्हीं धांवोनियां येतां वरावरी । पुरवितां श्रीहरि आर्त त्यांचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणसी कडवसां गे मायेचिया बैसा । मायाचि नाहीं मिथ्यापणें निजबोधप्रकाशा ॥१॥ लपों कोणीकडे गे सांग बाई निवाडें । अविदयाही म्हणसी तरी ते न दिसे निवाडे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणा तुम्हीं विष्णुदास । तेणें पुरे तुमची आस । काळा पडे त्रास । नामस्मरणें करूनी ॥१॥ उघडा मंत्र विठ्ठल हरी । सदा वाचे जो उच्चारी । होतसे बोहरी । पातकांसी तात्काळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥ चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवावया कोड त्याचें ॥१॥ त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावें । संतांशीं नमन नाम वाचें जपावेम ॥१॥ नामाविण साधन नाहीं या कलियुगी । व्यर्थ श्रम होती पाहतां मत्तें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥ तुमचा पुत्र तुम्हांसी जैसा प्रिय । तैसा मज होय नामदेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ