भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती । या हो या हो म्हणती पांडुरंगा

mhanavuni tumha nitya athaviti | ya ho ya ho mhanati panduranga

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती । या हो या हो म्हणती पांडुरंगा ॥१॥ तुम्हीं धांवोनियां येतां वरावरी । पुरवितां श्रीहरि आर्त त्यांचें ॥२॥ न साहे वियोग तुम्हां उभयतां । देवां आणि भक्तां एकवंकी ॥३॥ निळा म्हणे दोन्ही पिंड एक जीव । जाणती हा भाव निगमादिक ॥४॥