भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव

mhanaviton das te nahin karani | ant vari donhi bhinna bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥ गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥ पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालो या डोई दंभाचिया ॥२॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥३॥ तुका म्हणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥४॥