भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी

mhane krushnaraya shaligram dei | yeru lavalahi vadan pasari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥ चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥ स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥ एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥