भजनी मालिका

भजने

मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा ॥१॥ उदकाचें टवळें मसीची मात । अंधारी मुंगीनें तेथें लाविली ज्योती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुंगी व्याली शिंगी झाली तिचेम दूध किती । सतरा रांजण भरून गेले पेले बारा हत्ती । ॥१॥ आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

मुंगीचिया गळां बांधोनियां मेरू । तेणें हा प्रकारू कळों आला ॥१॥ माळियाचे पोरें लपविलें पोटीं । तेणें जगजेठी सुख मानीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मुंगीनें आकाश कवळिलें बाहीं । तेथें एक नवल वर्तलें पाहीं ॥१॥ मुंगी उमगा मुंगी उमगा । मुंगीचे माथां त्निवेणी गंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुंगीस तो मार्गु सांपडे गोडीचा । योगीचा लक्षीचा ज्ञान ज्योती ॥१॥ तरीच ओळखीजे केशवचरण । त्या जन्ममरण मग कैंचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं ॥१॥ राही रुक्माई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुतूनिया हायें भूमी सारविती । पोटासी पुसती दोघे-जण ॥१॥ घेऊनियां काष्ट घाशिताती दांत । वाकुल्या दावीत नंदा- लागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥ कानीं जें पेरिलें डोळां तें उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥ अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ