भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुतूनिया हायें भूमी सारविती । पोटासी पुसती दोघे-जण

mutuniya hayen bhumi saraviti | potasi pusati doghe-jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुतूनिया हायें भूमी सारविती । पोटासी पुसती दोघे-जण ॥१॥ घेऊनियां काष्ट घाशिताती दांत । वाकुल्या दावीत नंदा- लागीं ॥२॥ जेवितां जेवितां बाहेर पळती । श्वानासी बाहाती यूयू करुनी ॥३॥ तयापुढें दोघे ठेवूनियां वाटी । घालिताती मिठी गळां त्याच्या ॥४॥ देखोनियां जन खदखदां । हांसती । येशोदे सांगती कौतु-कानें ॥५॥ भिंती धरूनियां उभे राहाताती । आधार जगतीं ज्यांच्या असे ॥६॥ उभयतां जाती बिदीं खेळावया । कुरवंडी काया नामयाची ॥७॥