भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें

murali dharuni adharin | vajavin chhanden nanapari | bhovaten gopal nachati gujarin | yamunatiri ananden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥ स्थूल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्त्वतां । आगमांनिगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय ॥३॥ अचोच अवेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रं नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं ॥४॥