भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुनीजन साधिती साधनीं । तो हरी कोंदला नयनीं

munijan sadhiti sadhanin | to hari kondala nayanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुनीजन साधिती साधनीं । तो हरी कोंदला नयनीं ॥१॥ नवल हो नवल वाटलें । निरखितां निरखितां मनहीं आटले ॥२॥ स्थूल देहीं देहधर्मा । गोष्टी केली हो परब्रह्मां ॥३॥ व्यापला तो एका जनार्दनीं । पाहतां दिसे जनीं वनीं ॥४॥