भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगीचिया गळां बांधोनियां मेरू । तेणें हा प्रकारू कळों आला

mungichiya galan bandhoniyan meru | tenen ha prakaru kalon ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुंगीचिया गळां बांधोनियां मेरू । तेणें हा प्रकारू कळों आला ॥१॥ माळियाचे पोरें लपविलें पोटीं । तेणें जगजेठी सुख मानीं ॥२॥ कुलालाचे हातीं तुडविलें मूल । दाखवी नवल तयासाठीं ॥३॥ मजसाठीं काय धरियेलें मौना । धांव नारायना नामा म्हणे ॥४॥