भजनी मालिका

भजने

माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या ॥१॥ सिद्धच ठेवणें नामयानें ठेविलें । त्यासी कां लाविलें आडवें हें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥ नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥ केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें गुण आलें त्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥ पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझ्या मनें तुझ्या चरणीं दिली बुडी । इंद्रियें बापुडी वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जागावें हें कोणें । जाणोनी भो-गणें कोणें स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळां अंतरीं नारायण ॥१॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवाटा आम्हालागी॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥ पढियें देहभावें पुरवि वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम