भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं

majhya bapen maj didhalen bhatuken | mhanoni kavatuken krida karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥ केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें गुण आलें त्याचें ॥ध्रु.॥ घेऊनि विभाग जावें लवलह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥ तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥