भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांडवाच्या दारा पुढें । आणिला म्हातारा

mandavachya dara pudhen | anila mhatara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मांडवाच्या दारा पुढें । आणिला म्हातारा ॥१॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥ समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥ तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥