भजनी मालिका

भजने

ब्रह्मीं ब्रह्म एक मुळीं नाहीं जग । सर्व मायायोग कल्प जाणा ॥१॥ स्थावर जंगम सर्व मयोपाधि । जाण पां त्रिशुद्धि आत्मज्ञामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्रह्मी स्फुरें जें स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तूं लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे ॥१॥ कान्हु सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तुं निजानंदु रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥ जयासी नावडे हरीनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्राम्हण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥ रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ । वसे अनामिकीं विटाळ ॥१॥ हे तों यातिस्वभावगुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । चांडाळादि अधिकार ॥१॥ एका भावें गावें नाम । सोडोनियां क्रोधकाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण चारी । हें स्थान मान निर्धारीं तो मी ॥१॥ ब्रह्माचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ । आश्रम धर्मक समस्त नेव्हे मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्राह्मण न कळे आपुलें तें वर्म । गवसे परब्रह्म नामें एका ॥१॥ लहान थोरांसी करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्राह्मण हो तुम्ही सर्व नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामाविण गति न सरे आणिक । वैकुंठनायक बोले मुखें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामविण गति नाहीं हो आणीक । वैकुंठनायक बोले मुखें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्राह्मणवाक्यबळें वेदू नेमी जगा । येरव्ही राहे उगा थोटावला ॥१॥ ब्राह्मण तो ब्रह्मा ब्राह्मण तो ब्रह्मा । जयाचेनि कर्माकर्म दाटुगें जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्राह्मणा स्वधर्मक नित्य नैमित्तिक । व्हावे उपासक वेदांलांगीं ॥१॥ स्नानसंध्या वंदन हेंचि नित्य कर्म । तैसेचि हें वर्म पितृतृप्ति ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्राह्मणांची इच्छा पूर्ण झाली जेव्हां । आशिर्वाद तेव्हां वइताती ॥१॥ कल्पकोष्टी यासी नाही नाहीएं भय । सकळांचें ध्येय हेंचि असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघटा ॥१॥ हातें मोर्‍या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ