भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मण हो तुम्ही सर्व नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य

brahman ho tumhi sarva narinar | sarvansi adhar nam satya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्राह्मण हो तुम्ही सर्व नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामाविण गति न सरे आणिक । वैकुंठनायक बोले मुखें ॥२॥ परि तेंचि नाम पहावें शोधुनी । चौर्‍यांशीची खाणी तेव्हां चुके ॥३॥ नामा म्हणे आतां सद्‌गुरु वंदनी । नाम घ्या शोधुनि सत्य मुक्त ॥४॥