भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । चांडाळादि अधिकार

brahman kshatriy vaishya shudra | chandaladi adhikar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । चांडाळादि अधिकार ॥१॥ एका भावें गावें नाम । सोडोनियां क्रोधकाम ॥२॥ आशा मनशा टाका दुरी । मग इच्छा कल्पना काय करी ॥३॥ एका जनार्दनीं मन । करा देवासी अर्पण ॥४॥