भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मण न कळे आपुलें तें वर्म । गवसे परब्रह्म नामें एका

brahman na kale apulen ten varma | gavase parabrahma namen eka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्राह्मण न कळे आपुलें तें वर्म । गवसे परब्रह्म नामें एका ॥१॥ लहान थोरांसी करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥२॥ सर्वांप्रति माझी हेचि पै विनंती । आठवा श्रीपति आपुलें मनीं ॥३॥ केशव नारायण करावें आचमन । तेचि संध्या स्नान कर्म तया ॥४॥ नामा म्हणे हेंचि करा नित्य भजन । ब्रह्मार्पण साधन याचे पायीं ॥५॥