भजनी मालिका

भजने

बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥ विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥ ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाळपणीं हरी । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥ विटु दांडु चेंडु लगोर्‍या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥ लागलासे चाळा काय करूं आतां । नावरे वारितां अनावर ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं ॥१॥ येणें माझा कैसा घेतिलासे लाहो । आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥ एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बाहूबळें तुवां काढिलें अमृत । ठेवीं बा तो हात शिरा- चरी ॥१॥ जननी माझी जेव्हां ज्याकडे बाहत । ठेवीं बा तो हात शिरा-

रचनाकार: संत नामदेव

बीजीं फळाचा भरंवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड ॥१॥ हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम