भजनी मालिका
← भजनांकडे परत

बावनाचे संगती द्रुम भावें रातलें

bavanache sangati drum bhaven ratalen

बावनाचे संगती द्रुम भावें रातलें । सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥ लोहाचे सायास परिसेंसी फ़िटलें । तैसें मज केलें गोवळ्यानें ॥२॥ मेघजळ वोळे मिळें सिंधूचिया जळा । तैसा नव्हे तो वेगळा एक होऊनि ठेला ॥३॥ बापरखुमादेवीवरविठ्ठल नुरेचि कांहीं । उत्तम मध्यम ठाई व्यापुनि असे ॥४॥