भजनी मालिका
← भजनांकडे परत

बिजापोटीं महा तरु । होता फाकंला तो थोरु

bijapotin maha taru | hota phakanla to thoru

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बिजापोटीं महा तरु । होता फाकंला तो थोरु ॥१॥ सविताबिंब दिसे सान । प्रकाशिलें त्रिभुचन ॥२॥ तेंवि विठ्ठल विटेवरीं । भासे परि तो चराचरीं ॥३॥ निळा म्हणे जीवन जीवा । प्राण प्राण्यांचा आघवा ॥४॥