भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें

balapani aisin varushen gelin bara | khelatan ya pora nanamaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥ विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥ सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाळी धोंडी अंगबळें ॥३॥ तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥