भजनी मालिका
← भजनांकडे परत

बीज जाळुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं

bij jaluni keli lahi | amhan janmamaran nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बीज जाळुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥१॥ आकारासी कैंचा ठाव । देहप्रत्यय झाला देव ॥ध्रु.॥ साकरेचा नोहे उस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥ तुका म्हणे अवघा जोग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥