भजनी मालिका

भजने

अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं ॥१॥ उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥ प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥ अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असतां वैकुंठासी। काय सांगें ऋषिकेशी। जाऊनि मृत्युलोकाशी। जन भक्तिसी लावीं कां ॥१॥ आज्ञा वंदुनीया शिरीं। जन्मलों न्हावीयाचे उदरीं । वाचे नाम निरंतरीं । रामकृष्ण गोविंद ॥२॥

रचनाकार: संत सेना

असतां सुखरुप मातापिता वृद्ध । वैकुंठा स्वानंदे निघोनी गेलीं ॥१॥ संसाराची चिंता नाहीं विठठलासी । अखंड वृत्तीसी समाधान ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित ॥१॥ तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असतें उत्तम सुकृत जरी गांठी । तरी कां ऐसी आटी पडती देवा ॥१॥ लाजोनियां आजि पळतसा माघारे । ऐकोनी उत्तरें करुणेचीं हीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

असत्य जन्मलें असत्याचें पोटीं । अर्थबळें चावटीं शिकविती ॥१॥ अर्थीं धरूनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणें मंत्रयंत्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥ जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असत्याचा शब्द नको वाचे माझें । आणिक हो का वोझें भलतैसें ॥१॥ परि संतरज वंदीन मी माथां । असत्य सर्वथा नोहे वाणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असत्याचें मूळ नरदेह साचें । वायां काय याचे कवतूक ॥१॥ हरिनाम सार सेवीं तूं निर्धारें । आणीक पसार शीण वायां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असत्याचें मूळ बैसलें ये वाचे । तें न फिटती साचे तीर्थोदकें ॥१॥ हरीनामामृत प्रक्षाळी जिव्हेतें । पाणिये बहुतें काय करिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असाल तेथें नामाचे चिंतन। याहूनि साधन आणिक नाहीं ॥१॥ सोडवील माझा भक्ताचा कैवारी। प्रतिज्ञा निर्धार केला आम्ही ॥२॥

रचनाकार: संत सेना