भजनी मालिका
← भजनांकडे परत

असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार

asatya vachan hotan sarva jodi | jari lagnaghadi paraupakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥ जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥ वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥२॥ तुका म्हणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देईल दुःख ॥३॥