भजनी मालिका
← भजनांकडे परत

असत्याचें मूळ बैसलें ये वाचे । तें न फिटती साचे तीर्थोदकें

asatyachen mul baisalen ye vache | ten na phitati sache tirthodaken

रचनाकार: संत नामदेव · अभंग
असत्याचें मूळ बैसलें ये वाचे । तें न फिटती साचे तीर्थोदकें ॥१॥ हरीनामामृत प्रक्षाळी जिव्हेतें । पाणिये बहुतें काय करिती ॥२॥ गंगासागरादी तीर्थे कोडीवरी । हरिनामाची सरी न पवती ॥३॥ हरिनाम गंगे सुस्नात पै जाला । नाम्या जवळी आला केशिराज ॥४॥