भजनी मालिका
← भजनांकडे परत

असतां वैकुंठासी। काय सांगें ऋषिकेशी। जाऊनि मृत्युलोकाशी। जन भक्तिसी लावीं कां

asatan vaikunthasi| kay sangen rushikeshi| jauni mrutyulokashi| jan bhaktisi lavin kan

रचनाकार: संत सेना · अभंग
असतां वैकुंठासी। काय सांगें ऋषिकेशी। जाऊनि मृत्युलोकाशी। जन भक्तिसी लावीं कां ॥१॥ आज्ञा वंदुनीया शिरीं। जन्मलों न्हावीयाचे उदरीं । वाचे नाम निरंतरीं । रामकृष्ण गोविंद ॥२॥ कलियुगामाजी जाण । सोपें हेंचि साधन। रामकृष्ण नारायण। ऐसें पुरुषोत्तम सांगत ॥३॥ सेना म्हणे देवाधिदेवा। आम्ही करावी तुझी सेवा। हेंचि मागतों केशवा । नित्य रहावें मजपाशीं ॥४॥