भजनी मालिका

भजने

जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥१॥ संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षेपे हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥ करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव सभाग्य तोचि हरीरंगी नाचे ॥ध्रु०॥

जोडोनियां कर विनवी विश्वंभरा । चलावें मंदिरा सकळिकीं ॥१॥ अनाथावरी कृपा करा कृष्णनाथा । ठेवीतसें माथा पायांवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जोडोनियां धन नाशी वेश्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं म्हणे ॥१॥ वेश्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथें श्वान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जोडोनिया पाणि करी विनवणी धांय चक्रपाणी पांडुरंगा।।१।। कोणा निरविले हे नाही कळले येई गे विठ्ठले मायबहिणी ||२||

रचनाकार: संत लाडाई

जोडोनियां हात येतों काकुळती । धांब कृपामूर्ति आम्हांलागीं ॥१॥ अवतार घेसी दुष्ट वधायासी । येती गोकुळासी म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जोडोनियां हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥ सर्वसुखाहूनि हेंचि वाटे गोड । संसाराची ओढ मोडवेना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जोवरी तोंवरी जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥ तोंवरी तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जोवरी तोंवरी शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥ तोंवरी तोंवरी शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम