भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें

jodichya havyasen | lage dhananchen chi pisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें ॥१॥ मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥ पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥२॥ तुका म्हणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥३॥