भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां हात येतों काकुळती । धांब कृपामूर्ति आम्हांलागीं

jodoniyan hat yeton kakulati | dhamb krupamurti amhanlagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जोडोनियां हात येतों काकुळती । धांब कृपामूर्ति आम्हांलागीं ॥१॥ अवतार घेसी दुष्ट वधायासी । येती गोकुळासी म्हणोनियां ॥२॥ पाहोनियां तुला लक्षुमी पातली । दरिद्रें पळाली येथोनियां ॥३॥ सकळांसी सुख द्यावया आलासी । आम्हीं वनवासी दु:खी होतों ॥४॥ नामा म्हणे कंठीं धरियेला प्राण । दाखवीं चरण दयानिधी ॥५॥