भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी

joduniya jodi jenen hundarili duri | bhikechi avadi taya navade pandhari

जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥ करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव सभाग्य तोचि हरीरंगी नाचे ॥ध्रु०॥ आपण न करीं यात्रा दुजियासी जावो नेदि । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुध्दी ॥२॥ ऐसें जन्मोनि नर भोगिती अघोर । न करिति तीर्थयात्रा तया नरकीं बिढारे ॥३॥ पुंडलकें भक्तेरे तारिले विश्वजना । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरा पाटणा ॥४॥ कायावाचामनें जिवें सर्वस्वें उदार । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥५॥