भजनी मालिका

भजने

जेववाल तेंचि जेवीन मुखें । पांघरवाल सुखें पाघरेन ॥१॥ बैसवाल तेथे बैसेन उगा । निजवाल जागा न सोडीं तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥

रचनाकार: संत भानुदास

जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥ गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जैसा आंबा वर्षत पाडी । तैसी धरीं गोडी कीर्तनीं नाचें ॥१॥ न करी घातमात न लावी वेळू । तेणें हा गोपाळू अंतरला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥ न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ